'...अन्यथा कोल्हेंनी जाहीर माफी मागून निवडणूकीतून बाहेर पडावे'; आढळरावांनी कोल्हेंना खडसावले

'...अन्यथा कोल्हेंनी जाहीर माफी मागून निवडणूकीतून बाहेर पडावे'; आढळरावांनी कोल्हेंना खडसावले

शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.

ओतूर येथील सभेत, कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी आढळरावांनी संसदेत संरक्षण खात्याविषयी ७५ प्रश्न विचारल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चौफेर झोडपले. ते म्हणाले की, मी माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागून कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना ठणकावले. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नसून हार्डवेअरची आहे. मुळात पाच वर्षे गायब राहून निवडणूक आल्यावर कांदा प्रश्नावर कोल्हेंनी फक्त ओरड केली, पण त्यासाठी काय केलं, सरकारकडे पाठपुरावा केला का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;