‘देव तारी त्याला कोण मारी!’ एसटी बसला कंटेनरची धडक, बस नदीपात्रात कोसळण्यापासून थोडक्यात बचावली

‘देव तारी त्याला कोण मारी!’ एसटी बसला कंटेनरची धडक, बस नदीपात्रात कोसळण्यापासून थोडक्यात बचावली

>> प्रसाद नायगावकर

एसटी बसला पाठीमागून सिमेंट मिक्सरच्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या बसचा बॅलन्स बिघडला आणि ती नदीपात्रात कोसळणार होती. मात्र, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस कोरड्या नदीपात्रात कोसळण्यापासून वाचली. नदी कठड्यावर एका चाकावर स्थिरावली होती. बस नदीच्या कोरड्या पात्रात 50 फूट खाली कोसळली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे ही बस कठड्यावर एका चाकावर स्थिरावली आणि देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचे प्रत्यंतर आले.

हदगाव (जि. नांदेड) येथून एसटी बसही बस 50 प्रवाशांसह नागपूरकडे निघाली होती. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीकडे बस नेली आणि तिथे बस स्थिरावल्याने पुढील दुर्घटना टळली. या कठडयावर ही बस एका चाकावर अर्धी हवेत तर अर्धी नदी पात्रात अशा स्थितीत स्थिरावली होती. त्यामुळेप्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावले. त्याच्यामदतीने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळेबसमधील 50 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघात क्षेत्र बनले आहे. मागील चार दिवसांतील नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात असून दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. त्यामुळे येथील अपघात कमी करण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करून येथील त्रुटी दूर करण्याची मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;