बुलढाणा-अहमदपूर बसला लक्झरीची धडक; अपघातात एका महिलेचा मृत्यू, दोन जखमी

बुलढाणा-अहमदपूर बसला लक्झरीची धडक; अपघातात एका महिलेचा मृत्यू, दोन जखमी

बुलढाणा ते अहमदपूर एस.टी. बसला मागुन येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिली. या अपघातात बसमधील एका महिलेचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारस मेहकर चिखली रस्त्यावर नांद्रा फाट्याजवळ झाला.

बुलढाणा ते अहमदपूर बस मेहकरकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या लक्झरी बसने एस.टी.बसला धडक दिली. या अपघातात बसमधील अंजली गोपाल शर्मा (26,चिखली, जि.बुलढाणा) या महिलेचा मृत्यू झाला. बसमधील मुरलीधर नारायण इंगळे (67,बुलढाणा) आणि लक्झरीमधील महादेव गोपाल उबाळे (45,रिसोड,जि.वाशीम) जखमी झाले. मृत महिला परभणीला जात असल्याची माहिती मिळाली आहे. एस.टी.सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल देशमाने, वाहतूक निरिक्षक समाधान जुमडे, लिपिक प्रविण तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातातील मृतांच्या नातेवाईकास दहा हजार तर जखमींना पाच हजार तातडीची मदत देण्यात आली. मेहकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रमेश बाजड, हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी गेले व मदत केली. अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;