Janhvi Kapoor : श्रीदेवी यांच्या घरात आता सर्वसामान्यांनाही राहता येणार, पण कसं ?

Janhvi Kapoor : श्रीदेवी यांच्या घरात आता सर्वसामान्यांनाही राहता येणार, पण कसं ?

2018 साली अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि कुटुंबियांसाठी तर हा मोठा दु:खाचा क्षण होता. जान्हवी, खुशी आणि बोनी एकटे पडले. श्रीदेवीची आठवण आल्यावर ते तिघे अनेकदा चेन्नईत जाऊन तिथल्या घरी वेळ घालवायचे. खरंतर श्रीदेवी यांनी चेन्नईत एक घरं घेतलं होतं. सी-फेसिंग असलेल्या या घराचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांना ते शक्य झाले नाही. मात्र आता त्यांच्या पश्चात, श्रीदेवीच्या लेकीने आईचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीची ही इच्छा पूर्ण केली.

आईचं स्वप्न लेकीकडून पूर्ण

जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या घराचे थोडेसे रिनोव्हेशन करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. आता सामान्य लोकही इथे येऊन राहू शकतील. जान्हवीने हे घर एका रेंटल कंपनीला दिले आहे, त्यांनी ते ‘आयकॉन’ कॅटेगरीत टाकले आहे. बोनी कपूरसोबत लग्न केल्यानंतर श्रीदेवी यांनी हे घर विकत घेतले होते

रेंटल कंपनीसोबत झालेल्या या टायअप बद्दल जान्हवीने प्रतिक्रिया दिली. आम्ही माझ्या आईचे अनेक वाढदिवस तिथे साजरे केले आहेत. माझा आणि वडिलांचा वाढदिवसही साजरा केला. आई गेल्यानंतर आम्हाला या घरात जास्त वेळ घालवता आला नाही. कारण त्याचे रिनोव्हेशनही बाकी होते. या घराचे थोडं नूतनीकरण करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर व्हावे, अशी माझ्या आईची इच्छा होती. आई गेल्यानंतर बाबांनी ते रिनोव्हेशन करून घेतले. मला हे श्रीसाठी ( श्रीदेवी यांच्यासाठी) करायचं आहे, असं ते म्हणायचे, अशी आठवण जान्हवीने सांगितली. रिनोव्हेनशन केलं आणि आम्ही तिथे बाबांचा वाढदिवस साजरा केला. आई गेल्यानंतर बाबांनी पहिल्यांदा तिथे वाढदिवस साजरा केला. 2-3 वर्षांनी मी माझ्या वडिलांना थोडं आनंदी पाहिलं, असं जान्हवी म्हणाली.

श्रीदेवी यांच्या घरात कोण राहू शकतं ?

श्रीदेवी यांच्या या घराचे आता हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यानंतर सामान्य लोक इथे विनामूल्य राहू शकता. पण त्यासाठी त्यांना अप्लाय करावं लागले. जर ते गोल्डन तिकीट जिंकले, तर काही अटींचं पालन करून त्यांना या घरात विनामूल्य राहता येईल. यावर्षी 4000 तिकीटं उपलब्ध आहेत. जे यातलं तिकीट जिंकलील, ते अतिशय कमी किमतीत या आलिशान घरात राहू शकतात.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘उलझ’ या चित्रपटात दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;