दोन दिवसांत माफी मागा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; चित्रा वाघ यांना राज नयानी यांचा इशारा

दोन दिवसांत माफी मागा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; चित्रा वाघ यांना राज नयानी यांचा इशारा

भाजपच्या दिशाभूल करणाऱया जाहिरातबाजीची पोलखोल करणाऱया शिवसेनेच्या जाहिरातीमधील चरित्र कलाकाराची नाहक बदनामी करणाऱया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा अभिनेते प्याराली ऊर्फ राज नयानी यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेमुळे आपली आणि आपल्या कुटुंबीयांची मानहानी झाल्याचेही त्यांनी म्हटले केले.

निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने अनेक जाहिराती प्रसारित करून जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. असे असताना या खोटारडय़ा जाहिरातींना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जाहिरातींमधूनच सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. ‘वॉर तो रुकवादी ना पापा…’ या जाहिरातीमध्ये भाजपने अनेक गोष्टींमध्ये जनतेची फसवणूक केल्याचे वडील आपल्या मुलीला समजावत असल्याचे दिसत आहे. भाजपने भ्रष्टाचाऱयांना पक्षात घेतले, काळे धन आणले नाही, महिलांवरील अत्याचार रोखले नाहीत, महागाई-बेरोजगारी रोखली नाही. देशाची सपशेल वाट लावली’, असे वडील आपल्या मुलीला सांगत असल्याचे दिसत आहेत. मात्र ती मुलगी ‘वॉर तो रुकवादी ना पापा…’ असे वांरवार सांगून भाजपचीच बाजू मांडत आहे. मात्र हीच मुलगी शेवटी ‘भाजपला मत तर तुम्हीच दिले ना पापा’ असा टोला लगावते. तेव्हा वडील खजील झाल्याचे दिसते. मात्र या जाहिरातीमध्ये वडिलांची भूमिका करणारे प्याराली ऊर्फ राज नयानी हे पॉर्न स्टार असल्याचा दावा करीत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. याचा समाचार आज खुद्द अभिनेते राज नयानी यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून घेतला आहे.

राजकीय फायद्यासाठी कलाकाराची बदनामी करू नका

मी मुंबईत राहणारा मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील माणूस असून चरित्र कलाकार आहे. विविध शो, वेब  सीरिज, बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. भूमिका साकारताना आम्ही पॅरेक्टरनुसार अभिनय करीत असतो. असे असताना चित्रा वाघ यांनी अचानक माझ्याबद्दल बदनामीकारक जाहीर वक्तव्य केल्याने धक्का बसल्याचे राज नयानी यांनी म्हटले आहे. यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. त्यामुळे परिवारही डिस्टर्ब झाला आहे. शिवाय माझे पॅरेक्टर, इमेज आणि पर्सनॅलिटीला धक्का बसला आहे. चित्रा वाघ यांनी राजकीय फायद्यासाठी कलाकारांची नाहक बदनामी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;