संविधान बदलणे हा भाजपचा गेम प्लॅन – प्रकाश आंबेडकर
संविधान बदलणे हा भाजपाचा प्लॅन आहे. मात्र, आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एका मुलाखतीत संविधानावर भाष्य केले होते. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप सत्तेत आला तर संविधान रद्द करतील असे सांगितले होते. त्यामुळे मोदी सातत्याने संविधान बदलणार नाही असे सांगत असले तरी संविधान बदलणे हा भाजपाचा गेम प्लॅन असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या निवडणुकीत 400 पार तर
दूरच भाजप 200 पारही जाणार नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List