विंडीजचा आक्रमक संघ जाहीर

विंडीजचा आक्रमक संघ जाहीर

जगातील टी-20 क्रिकेट गाजवणाऱया वेस्ट इंडीजच्या सर्व आक्रमक खेळाडूंना मायदेशात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आले आहे. रोवमन पॉवेलकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवले असून गेल्या वेळी वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू न शकलेल्या शिमरॉन हेटमायरचीही निवड करण्यात आली आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला कसोटीत हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी करताना जबरदस्त गोलंदाजी करणाऱया शामर जोसेफलाही 15 सदस्यीय संघात घेण्यात आले आहे. तो आतापर्यंत केवळ तीनच टी-20 सामने खेळला असून त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 चा एकही सामना खेळता आलेला नाही. या स्पर्धेसाठी सुनील नारायणच्याही नावाचा विचार करण्यात आला असल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक डॅरेन सॅमीने दिली. मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मागे घेण्यास नकार दिल्यामुळे निवड समितीला नवा खेळाडू निवडावा लागला.

विंडीजचा संघ ः रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शामर जोसेफ, ब्रॅण्डन किंग, निकोलस पूरन, शाय होप, आंद्रे रसल, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुदाकेश मोती, शेरफन रुदरपर्ह्ड.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;