गोयल दांपत्याची कर्करोगाशी झुंज; ईडीचा जामिनाला विरोध
कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. पत्नीला व मला कर्करोग आहे. पत्नीकडे केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. अंतिम क्षणात दोघांना एकत्र राहायचे आहे. त्यामुळे अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी गोयल यांनी शुक्रवारी न्यायालयात केली.
न्या. एन.आर. जमादार यांच्या एकल पीठासमोर गोयल यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मानवतेचा दृष्टिकोन ठेवून अंतरिम जामीन द्यावा, अशी विनंती ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी गोयल यांच्याकडून केली. याला सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला. गोयल सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्याच रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. तेथे ते पत्नीला भेटू शकतात. एकत्र वेळ घालवू शकतात. त्यासाठी खास जामीन मंजूर करण्याची आवश्यकता नाही, असा दावा अॅड. वेणेगावकर यांनी केला. उभयतांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला. येत्या सोमवारी न्यायालय याचा निकाल देणार आहे.
ईडीचा युक्तिवाद
गोयल यांचा रुग्णालयातील उपचाराचा कालावधी अजून चार आठवडय़ांसाठी वाढवला जाऊ शकतो. वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेता येईल. ते दोघे एकाच ठिकणी असताना नरेश गोयल यांना अंतरिम जामीन मंजूर करावा, असा काहीच मुद्दा नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List