कोव्हिशिल्ड लसीमुळे आमच्या मुलीचा जीव गेला; सिरमविरोधात पालक न्यायालयात
कोव्हिशिल्ड लसीचे क्वचितप्रसंगी एखाद्याच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱया अॅस्ट्राझेनेका कंपनीने पहिल्यांदाच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. त्यानंतर सिरम इन्स्टिटय़ूटविरोधात एका मुलीच्या पालकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानात अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिटय़ूटने कोव्हिशिल्ड ही लस बनवली. याच लसीमुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा पालकांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. रितीका श्री ओत्री (18) असे मृत मुलीचे नाव असून तिने मे 2021 मध्ये कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून आर्किटेक्चरचा अभ्यास सुरू केला होता. लस घेतल्यानंतर सातच दिवसांत तिला ताप आला, उलटय़ा आणि प्रचंड अशक्तपणा आला. त्यामुळे तिच्या पालकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिचा एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला. त्यावेळी तिच्या डोक्यात रक्ताच्या गुठळय़ा झाल्याचे निदर्शनास आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List