नेपाळी व्यक्तींचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

नेपाळी व्यक्तींचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

रत्नागिरी जिल्ह्यात दोन नेपाळी व्यक्तींचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवासंपूर्वी घडली होती. मात्र आता पोलिसांना या खूनातील आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खडकबहादूर बलराम थापा क्षेत्री (वय 72) आणि भक्तबहादूर बलराम थापा क्षेत्री (वय 67) यांचा धारधार हत्याराने खून करण्यात आला होता. दोघेही गोळप येथील आंबा बागेत राखणी करण्याचे काम करत होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या आंबा बागायतदार आणि त्यांच्या बागेतील गुरख्यांची चौकशी केली. पोलिसांनी चौकशी केली असात गोळप येथील आंबा बागेत राखण करणारा नेपाळी सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (वय 58) याने खून केल्याची माहिती उघड झाली. खून करण्यामगचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर करत होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;