T20 World Cup 2024 : निवड झाली नाही, मात्र संजू सॅमसनसाठी खूश आहे ‘हा’ खेळाडू

T20 World Cup 2024 : निवड झाली नाही, मात्र संजू सॅमसनसाठी खूश आहे ‘हा’ खेळाडू

आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे 15 खेळाडू अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र असेही काही खेळाडू आहेत ते सध्या IPL 2024 मध्ये तुफान फॉर्मात असून त्यांची टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेली नाही. राजस्थानचा स्टार खेळाडू रियान परागने या सर्व घडोमोडींवर पत्रकारांशी बोलताना चांगली प्रतिक्रिया दिली आहे.

22 वर्षीय रियान परागने राजस्थान रॉयल्स कडून खेळताना आतापर्यंत विस्फोटक फलंदाजी करत सर्वांची मन जिंकलेली आहेत. मागच्या हंगामात त्याचा खेळ सुमार राहिला होता. मात्र या हंगामात टीका करणाऱ्यांची बोलती त्याने बंद केली आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये त्याची निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे. या संदर्भात त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्याने गमतीशीर पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या वर्षीपर्यंत तर मी आयपीएल खेळण्याच्या शर्यतीत सुद्धा नव्हतो. मात्र मी काही अफवा एकल्या आहेत. मी सोशल मीडियावरही नाही. पण माझ्या नावाची चर्चा झाल्याचे मी एकले, मला आनंद आहे की लोकं माझ नाव योग्य कारणांसाठी घेत आहेत, ” असे म्हणत रियान परागने आपले मत मांडले आहे.

“राजस्थान रॉयल्सच्या ज्या खेळाडूंची टी-20 विश्वचषक 2024 साठी निवड झाली आहे. त्यांच्यासाठी मी खूप खूश आहे. विशेष करून संजू सॅमसनची टीम इंडियात निवड होणे ही खूप खास गोष्ट आहे. मी आशा करतो की आपण टी20 विश्वचषक यावेळी नक्की घरी घेऊन येऊ,” अस म्हणत रियान परागने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;