सोनिया गांधींबाबतच्या मोदींच्या त्या वक्तव्यावर काँग्रेस भडकली, शेअर केला व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या देशभरात प्रचार करत आहेत. या प्रचारसभांमध्ये विरोधकांवर मोदींकडून जहरी टीका केली जात आहे. शुक्रवारी एका सभेत मोदींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्यावर देखील खालच्या शब्दात टीका केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने मोदींच्या त्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला असून, मोदीजी आता निवडणूकीसाठी किती खालच्या स्तरावर जाणारा आहात, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, मी सांगितलेले की यांची सर्वात मोठी नेता निवडणूक लढवण्याची हिंमत नाही करणार. घाबरून त्या पळून जातील. झालंही तसंच. पळून त्या राजस्थानला गेल्या व राज्यसभेत आल्या”. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस भडकली आहे.
काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांनी सोशल मीडियावर या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत मोदींवर टीका केली आहे. ”आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेबाबत अशी घाणेरडी व टपोरी भाषा वापरणारा हा व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे. याहून दुर्दैवी काही नाही. नरेंद्र मोदी, तुम्ही आणखी किती खाली पडणार आहात? असा सवाल श्रीनिवास यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List