अर्धनग्न अवस्थेत हॉटेल बाहेर पडली ब्रिटनी स्पिअर्स, अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का
जगप्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पिअर्स ही गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. ब्रिटनीबद्दल अनेकदा मीडियामध्ये विचित्र बातम्या येत असतात. आता पुन्हा एकदा ब्रिटनी विचित्र अवस्थेत सर्वांसमोर आली आहे.
ब्रिटनी व तिचा बॉयफ्रेंडमध्ये एका हॉटेलमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ब्रिटनी टॉपलेस अवस्थेत त्या हॉटेलमधून बाहेर पडली. तिने फक्त एक चादर आणि उशी फक्त तिने शरीरासमोर धरली होती. तिचे केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावरून ती प्रचंड त्रस्त दिसली.
Britney Spears’ın ruh sağlığı yine endişe konusu! Britney Spears sinir krizi mi geçirdi? #BritneySpears https://t.co/XbBVZah5gX pic.twitter.com/3nYDrD6OjM
— Son Mühür (@sonmuhurhaber) May 3, 2024
एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनी व तिचा पॉल रिचर्ड हे दोघे एका बड्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. रात्री उशीरा त्याच हॉटेलमध्ये रुम घेऊन ते राहणार होते. मात्र त्या दोघांमध्ये काही कारणास्तव वादावादी झाली. हा वाद एवढा वाढला की त्याचं रुपांतर मारामारीत झालं. त्यानंतर ब्रिटनी टॉपलेस, अनवाणी हॉटेलबाहेर पडत होती. त्यावेळी हॉटेलमधील स्टाफने तिला चादर व उशी आणून दिली. ब्रिटनीला अशा अवस्थेत पाहून अँब्युलन्स बोलवण्यात आली. मात्र तिने अँब्युलन्समधून जाण्यास नकार दिला. ब्रिटनीच्या पायाला जखमा झाल्या होत्या.
माझी मनस्थिती ठीक नाही अशा बातम्या मी वाचल्या ज्या सपशेल खोट्या आहेत. मी रोज अशा प्रसंगांना सामोरी जाऊन आता माझ्यात बळ आलं आहे हे ज्या लोकांना माहीत आहे त्यांचा मी आदर करते. जे काही झालं त्यानंतर आता मी इतकंच सांगू इच्छिते की मला आत्ता एक टूथब्रश हवा आहे. तसंच एक एक्स्प्रेसो कॉफी हवी आहे. मी हे का पोस्ट करते आहे ते देखील मला आत्ता नीट सांगता येणार नाही. मी एक मुलगी आहे आणि माझे पिरियड्स सुरु आहेत. तसंच रात्री माझा पायही मुरगळला आहे. मला पॅरामेडिकल सेवाही उपलब्ध झाली नाही. मला वाटतंय माझा मानसिक छळच झाला आहे. मी आता बोस्टनला जाते आहे, अशी पोस्ट ब्रिटनीने लिहिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List