याड लागलं! 45 दिवसांत मुंबईकराने 300 हून अधिक आईस्क्रिम केल्या फस्त

याड लागलं! 45 दिवसांत मुंबईकराने 300 हून अधिक आईस्क्रिम केल्या फस्त

सध्या देशभरात उष्णतेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याचे चित्र असून शासनाकडून वारंवार तशा सुचना सुद्धा दिल्या जात आहेत. असे असले तरी नागरिकांना विविध कारणांमुळे घराबाहेर पडावचं लागत. त्यामुळे उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी विविध क्लृप्त्या आजमावल्या जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेष करुन आईस्क्रिम आणि विविध कोल्ड्रींक्सला मोठी मागणी असले. मात्र नुकत्याच Swiggy ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार आईस्क्रिमच्या मागणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगली वाढ झाली आहे.

Swiggy ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार आईस्क्रिमच्या मागणीत गेल्या वर्षीच्या (2023) तुलनेत या वर्षी (2024) 16 टक्के वाढ झाली आहे. 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत संध्याकाळी 7 ते मध्यरात्री पर्यंत सर्वाधिक आईस्क्रिमच्या ऑर्डर आल्या आहेत. विशेष करुन या वेळेमध्ये 6.9 लाखांहून अधिक आईस्क्रिमच्या ऑर्डर ग्राहाकांनी केल्या आहेत. तसेच सकाळी 7 ते 11 या वेळेत सुद्धा 80,000 आईस्क्रिमच्या ऑर्डर स्विगीने दिल्या. सर्वाधिक आईस्क्रिमच्या ऑर्डर देण्यामध्ये बंगळुरु शहराने पहिला क्रमांक पटकवल्याचे स्विगीच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झाले आहे.

वाढत्या उष्णतेचा मुंबईला सुद्धा चांगलाच फटका बसला आहे. मात्र ऊन, वारा आणि पाऊस कसाही असो मुंबईकर कधीही थांबत नाही. याचाच प्रत्यय स्विगीच्या रिपोर्टमध्ये आल्याचे चित्र आहे. कारण मुंबईच्या एका व्यक्तीने स्विगीवरून 45 दिवसांत 300 हून अधिक आईस्क्रिमच्या ऑर्डर करत आईस्क्रिमचा मनमुराद आनंद लुटला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;