Video ठाण्यात मिंधे गटाच्या मिरवणुकीत राडा, गुंडांच्या दोन टोळ्या भररस्त्यात भिडल्या

Video ठाण्यात मिंधे गटाच्या मिरवणुकीत राडा, गुंडांच्या दोन टोळ्या भररस्त्यात भिडल्या

ठाण्यातील मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मिरवणूकीत गुंडांची गुंडगिरी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काढलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या गुंडांच्या दोन टोळीमध्ये जोरदारा राडा झाला. भररस्त्त्यात दोन गटातील गुंड एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सामान्य जनतेने देखील ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. जिथे उमेदवाराच्याच रॅलीत अशाप्रकारे हाणामारी होऊ शकते तिथे महाराष्ट्रातील सामान्य जनता तरी सुरक्षित कशी राहणार असा सवाल सामान्य जनतेकडून केला जात आहे. दरम्यान हे दोन्ही गुंड मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ठाण्यातील मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत काही दिवसांपूर्वी मिंधे गटात प्रवेश केलेले अजय पासी आणि युट्यूब भाई म्हणून कुप्रसिद्ध असलेला सिद्धू अभंगे हे देखील आपल्या साथीदारांसह सहभागी झाले होते. हे दोन्ही गुंड मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील कोपरी परिसरातच रहात असून वर्चस्वासाठी या दोन्ही टोळ्यांमध्ये कित्येक वर्षांपासून वैमनस्य आहे. या टोळ्यांमधून विस्तव जात नाही. आजची मिरवणूक बाजारपेठेतील मराठी ग्रंथ संग्रहालयासमोर आली असतानाच दोन्ही टोळ्यांचे म्होरके एकमेकांसमोर आले. त्यानंतर या दोन्ही टोळ्यांमध्ये चक्क पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत या गुंडांची पांगापांग केली. दरम्यान सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यावर हाणामारी, अंमली पदार्थ बाळगणे, खंडणी, अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;