आमदार किरण सरनाईक यांच्या कुंटुंबातील कारचा भीषण अपघात, पाचजण ठार

आमदार किरण सरनाईक यांच्या कुंटुंबातील कारचा भीषण अपघात, पाचजण ठार

विधानपरिषदेचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील कारचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. यावेळी आमदार किरण यांचे कुंटुंबीय त्या गाडीत होते. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. यावेळी कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि त्यांची नात हे प्रवास करत होते. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. तसेच पुढील तपास सुरू आहे.

पातूर शहराजवळ झालेल्या या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबीयांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (28) याचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (30), सिद्धार्थ यशवंत इंगळे (35) तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;