भीषण अपघात; अजिंठा घाटात 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी उलटली

भीषण अपघात; अजिंठा घाटात 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी उलटली

सामान्य जनतेची जीवन वाहिनी आणि गावागावांना शहरांशी जोडणार एक महत्वाच माध्यम म्हणजे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस (ST). महिलांना एसटीमध्ये 50 टक्के आरक्षण आणि वयस्कर व्यक्तींना मोफत एसटी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे जनता सुद्धा एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र बसेसच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असताना आता छत्रपती संभाजी नगरमध्ये एसटीचा मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

धाराशिव, लातूरमध्ये मोदींचे ‘पंजापुराण’! सिंचन, जलयुक्तची कामे केल्याची थाप, सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन आल्याचा दावा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये अजिंठा घाटात पुणे ते रावेर या मार्गावर धावणाऱ्या एसटीचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या एसटीमध्ये 66 प्रवासी प्रवास करत होते. अजिंठा घाटातून प्रवास करत असताना चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि एसटी उलटली. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;