उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल मोदी भीतीपोटी बोलताहेत; रोहित पवार यांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मीडिया समोर जात नाहीत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती आहे ती बघून आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्रात जे काही वातावरण केलेलं आहे ते आता मोदींना काही तोडता येईना. आणि पवारसाहेबांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलेलं आहे, असा घणाघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. पवारांमध्ये वारशावरून वाद सुरू आहे. पुतण्याला नेतृत्व द्यायचं की मुलीला? यावरून वाद होत आहेत. ते या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत, महाराष्ट्र काय सांभाळणार? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली होती. त्याला रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
अजितदादांना जवळ करून मराठी माणसांना झुकवण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसांच्या नादी तुम्ही लागू नका, हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं. मराठी माणूस दिल्लीसमोर झुकत नाही, उलट दिल्लीला आपल्यासमोर झुकवतो. आज मोदी हे पवारसाहेबांमुळे इतके इतके घाबरले आहेत की, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात वेगळे प्रयत्न करावे लागत आहेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
हा सूर्य आणि हा जयद्रथ! कृषीमंत्री असतानाचा हिशेब देत शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
शरद पवारसाहेबांना कुटुंब सांभाळता येत नाही, या वक्तव्यावरून रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीसाहेबांना एवढचं सांगायचं आहे, तुमच्या कुटुंबाबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे इतरांच्या बाबतीत बोलू नये, असं Rohit Pawar म्हणाले.
चोरी करून सगळी यंत्रणा अजित पवार स्वत:साठी वापरत आहेत; राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल
जनता जर तुमच्या सोबत असेल तर स्पेशल रिपोर्ट का करावा लागला? याचा अर्थ भाजप महाविकास आघाडीला आणि पवारसाहेबांना घाबरला आहे, हे यातून सिद्ध होतं. तुम्ही उद्धव ठाकरेसाहेबांबद्दल जे काही बोलाल, पवारसाहेबांबद्दल जे काही बोलाल ते फक्त अन् फक्त भीतीपोटी बोलताहेत, असं सणसणीत प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं. 4 जूननंतर मोदी आणि भाजप सत्तेत येणारच नाही, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांनी आपलं सरकार कसं टिकेल ते पाहावं, असंही रोहित पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List