‘त्या’ पोलिसाचा मृत्यू चोरट्यांच्या झटापटीत नव्हे; पोलिसांना CCTV फुटेज सापडले

‘त्या’ पोलिसाचा मृत्यू चोरट्यांच्या झटापटीत नव्हे; पोलिसांना CCTV फुटेज सापडले

मोबाईल चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्याने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता त्यांच्या हाती सीसीटिव्ही फुटेज लागले आहे. त्यानुसार ही घटना मोबाईल चोरी आणि झटापट नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचा तपास सुरू आहे.

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल विशाल रमेश पवार या तरुणाचा 27 एप्रिल सव्वाबाराच्या सुमारास मोबाईल चोरीला गेला.  मोबाईल चोराचा पोलिसांनी पाठलाग केला असता चोर आणि पोलीस यांची झटापट झाल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाला 1 मे रोजी सायंकाळी मिळाली. या घटनेबाबत कोपरी पोलीस ठाणे येथे 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर कोपरी पोलीस ठाणे येथे हा गुन्हा लोहमार्ग आयुक्तालयात वर्ग करण्यापूर्वी तक्रारदार विशाल पवार यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याची कागदपत्रे जमा झाल्यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी कलम 302, 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

चोरटय़ाने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलिसाचा मृत्यू, सायन-माटुंगादरम्यानची घटना

सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे आयुक्तालयात वेगवेगळी पोलीस पथके नेमून तपास सुरू करण्यात आला. मृत्युपूर्वी विशाल पवार यांनी कोपरी पोलीस ठाणे येथे जबाब दिला होता. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन, फलाट परिसर, रेल्वे ब्रिज, आस्थापना या ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज तपासले जात आहे. त्याचा विविध तांत्रिक अंगाने तपास सुरू आहे. तक्रारीत नमूद वेळी व त्यानंतर सुमारे 5 ते 6 तास व त्यानंतरही मृत विशाल पवार हे सीसीटिव्ही फूटेजमध्ये इतरत्र ठिकाणी आढळले. प्रथम दर्शनी फिर्यादीत नमूद वेळी व त्याच्या आसपास माटुंगा-सायन रेल्वे स्टेशन दरम्यान फटका मारुन मोबाईलची जबरी चोरी व त्यांच्यातील झटापटीची घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिसाचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला याचा तपास सुरू आहे. तपास युद्ध पातळीवर सुरू असून तपासाबाबत संपूर्ण सत्य समोर येणार, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;