अर्जुन कपूर नव्हे तर ‘या’ स्पेशल व्यक्तीसोबत मलायका अरोरा स्पाॅट, पापाराझींना पाहून..

अर्जुन कपूर नव्हे तर ‘या’ स्पेशल व्यक्तीसोबत मलायका अरोरा स्पाॅट, पापाराझींना पाहून..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर इतक्या वर्षांनी अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत काही महिन्यांपूर्वी लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

मलायका अरोरा ही काही दिवसांपूर्वीच लेक अरहान खान याच्यासोबत थेट अरबाज खान याच्या घरी पोहचली. हेच नाही तर यावेळी पापाराझी यांच्याकडे दुर्लक्ष करताना मलायका अरोरा दिसली. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्या घरी पोहचल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या. विशेष म्हणजे अत्यंत खास लूकमध्ये मलायका अरबाजच्या घरी पोहचली होती.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान त्याच्या शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आई मलायका अरोरा, वडील अरबाज खान आणि सावत्र आई शूरा खान यांच्यासोबत अरहानचे चांगले रिलेशन दिसतात. काही दिवसांपूर्वीच सावत्र आई आणि वडिलांसोबत डिनरसाठी अरहान खान हा पोहचला होता, ज्याचे काही फोटोही व्हायरल झाले.

आता नुकताच अरहान खान हा आई मलायका अरोरा हिच्यासोबत लंचसाठी पोहचल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर पापाराझी यांना खास पोझ देताना मलायका अरोरा आणि अरहान खान हे दिसले. यावेळी मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. आता मलायका अरोरा आणि अरहान खान यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अरहान खान हा विदेशात शिक्षण घेत असून तो लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. अरहान खान याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा पोहचली होती. यावेळी मलायका अरोरा आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा करताना देखील दिसली. मलायका अरोरा नेहमीच अर्जुन कपूर याच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;