सोनाक्षी सिन्हा वडिलांप्रमाणे करणार राजकारणात प्रवेश? अभिनेत्री म्हणाली…

सोनाक्षी सिन्हा वडिलांप्रमाणे करणार राजकारणात प्रवेश? अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज अखेर 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सीरिजची कथा लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी आणि तेथील सुंदर महिलांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या सीरिजमधील भूमिकेची चर्चा रंगली आहे.

दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने राजकारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा तिला विचारण्यात आले की, अभिनेत्री वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करणार का? तेव्हा अभिनेत्रीने मजेदार उत्तर दिले. तिथेही लोक त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करतील असं सोनाक्षी म्हणाली.

सोनाक्षी म्हणाली, ‘नाही… मी राजकारणार प्रवेश करणार नाही. नाहीतर तुम्ही परत नेपोटिज्म-नेपोटिज्म सुरु कराल… पण खरं सांगतेय मला नाही वाटत मी कधी राजकारणात प्रवेश करेल. मी माझ्या वडिलांना पाहिलं आहे. मला वाटत नाही की माझ्यात यासाठी प्रतिभा आहे. माझ्या वडिलांना लोकांमध्ये राहायला आवडतं. जे मला आवडत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘राजकारणासाठी मला सतत लोकांमध्ये राहावं लागे… सतत त्यांच्यासाठी हजर राहावं लागेल… मी माझ्या वडिलांना असं करताना पाहिलं आहे. माझ्या ही गोष्ट नाही असा विचार करु नका…’ सध्या सर्वत्र सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही… सोनाक्षी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री ‘हिरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या  फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;