भाजप आमदाराची पोलिसाला खुलेआम धमकी, माजी मुख्यमंत्र्यांसमोरच घडला संतापजनक प्रकार

भाजप आमदाराची पोलिसाला खुलेआम धमकी, माजी मुख्यमंत्र्यांसमोरच घडला संतापजनक प्रकार

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असताना मध्य प्रदेशमधील विदिशा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोजपूर विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र पटवा यांनी पोलिसाला धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार घडला तेव्हा मंचावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे भाषण सुरू होते.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नियमांचा हवाला देत पोलीस अधिकारी महेंद्रसिंह ठाकूर यांनी 10 वाजता प्रचार बंद करण्यास सांगितले. याचा राग आल्याने भाजप आमदार सुरेंद्र पटवा यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली.

मंचावरूनच हातवारे करत पटवा यांनी पोलीस अधिकाऱ्याला ‘तुला अशा जागी फेकेन (बदली करेन) की…’, अशा शब्दात धमकी दिली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंचावरील कार्यकर्त्यांनी भाजप आमदाराला आवरले. हा प्रकार घडला तेव्हा शिवराज सिंह चौहान भाषण करत होते. त्यांनीही आमदार पटवा यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान हे जवळपास 35 वर्षांनी विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मध्य प्रदेशमधील हा सर्वात हायप्रोफाईल मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराजही निवडणूक लढल्या आणि जिंकल्या होत्या.

विदिशा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 8 जागा येतात. यात भोजपूर, विदिशा, इच्छावर, सांची, बासौदा, खाटेगांव, सिलवनी आणि बुधनी मतदारसंघाचा समावेस आहे. भोजपूर विधानसभेमध्ये आयोजित एका सभेला संबोधित करण्यासाठी शिवराज सिंह चौहान पोहोचले होते. त्याचवेळी भाजप आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यात प्रचार थांबवण्याच्या वेळेवरून बाचाबाची झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;