‘सामना’च्या बातमीचा दणका… रेती तस्करीचा भांडाफोड

‘सामना’च्या बातमीचा दणका… रेती तस्करीचा भांडाफोड

वर्धा जिल्ह्यात रेती तस्करांची दहशत सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या खनिजावर दरोडा टाकला जात असल्याची बातमी सामनामध्ये प्रसिद्ध होताच हिंगणघाट तालुक्यांत वेगवेगळ्या भागात पोलीसांनी कारवाई करत 7 मोठें टिप्पर, एक ट्रक, रेती काढण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिकी बोट, पोकलँड मशीन जप्त करत 2 कोटी 33 लाख रुपयांच्या रेतीसह मुद्देमाल जप्त केला आहे.

हिंगणघाट तालुक्यात शेकापूर (बाई), कुटकी शिरसगाव परिसरातील नदीपात्र बोटद्वारे रेती काढून 20 फुटांपर्यंत पोखरून ठेवले आहे. रोज 400 ते 500 टिप्पर रेती खुलेआम वर्धा जिल्ह्यातच नव्हें तर अमरावती व अकोला जिल्ह्यात चोरीच्या पद्धतीने सुरू होती. चक्क पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापुढील व निवासस्थाना समोरून ही सर्व चोरी खुलेआम सुरू होती. सामनामध्ये बातमी येताच पोलीस विभाग जागा होत कारवाईत लागला मात्र खरी महसूल विभागाची जबाबदारी असलेले हिंगणघाट तालुक्यांतील महसूल अधिकारी आजही आपले डोळे मिटून असल्याचे चित्र असल्याची शहरात चर्चा आहे.

हिंगणघाट तालुक्यांत रस्त्यांवर सापळा रचून कारवाई झाली मात्र अद्याप वाळू घाटात जाऊन कारवाई झाली नाही. ही कारवाई वाळू घाटात केली गेली असती तर हा आकडा 50 टीप्परच्या वर गेला असता अशी चर्चा आहे.

एकंदरीत आज झालेल्या कारवाईत दारोडा, शेकापूर, साती, कात्री या घाटाचा उल्लेख आहे. यामुळे या डेपो चालकांचे डेपो रद्द करण्याचा प्रस्ताव नियमाने पाठविणे बंधनकारक असून हे डेपो रद्द करणे महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;