रायबरेलीमधून राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज; सोनिया गांधी, प्रियंका यांचीही उपस्थिती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची आई माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उपस्थितीत आज उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील गांधी यांच्यासोबत होते. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर केली होती.
आज सकाळी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली या दोन हाय-प्रोफाइल जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. गांधी यांना अमेठीतून उमेदवारी दिली जाऊ शकते या शक्यतांना पूर्णविराम देत त्यांनी लोकसभेत तीनदा प्रतिनिधित्व केलेल्या जागेसाठी किशोरी लाल शर्मा यांची निवड केली.
रायबरेली ही काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. आतापर्यंत झालेल्या 20 निवडणुकांपैकी काँग्रेसने 17 वेळा ही जागा जिंकली आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये या जागेने सोनिया गांधींना निवडून दिले आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या समर्थनाची लाट असतानाही ही जागा काँग्रेसकडेच राहिली. सोनिया गांधी आता प्रतिष्ठेची जागा सोडून राज्यसभेवर गेल्या आहेत. रायबरेलीमध्ये गांधी हे भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांच्या विरुद्ध लढणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्मा म्हणाले की, ते 40 वर्षांपासून अमेठीमध्ये काम करत आहेत. ‘काँग्रेसने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली याबद्दल मी खूप आभारी आहे. मी 1987 मध्ये युवक काँग्रेसचा सदस्य म्हणून येथे आलो आणि तेव्हापासून मी येथे आहे. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात राजीव (गांधी) यांच्यासोबत केली. 1987 मध्ये, राजीवजी मला इथे घेऊन आले मग परिस्थिती अशी होती की मी इथेच राहिलो’.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List