अमेठीतील उमेदवारासंदर्भात प्रियंका गांधी यांचं मोठं विधान, व्यक्त केला विश्वास
Lok Sabha Election 2024: प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी त्यांनी किशोरी लाल शर्मा यांच्या कामाचं कौतुक केलं.
‘किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत आणि तुम्ही त्यांना 40 वर्षांपासून ओळखता. त्यांना अमेठीच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे. आम्ही एकत्र लढू आणि किशोरी लाल शर्मा यांचा विजय निश्चित करू’, असं त्या म्हणाल्या.
यानंतर प्रियंका गांधी या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी रायबरेलीला रवाना झाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List