दोन प्रौढांमध्ये परस्पर सहमतीने झालेले शारिरीक संबंध बलात्कार नाही, दिल्ली उच्च न्यायालय

दोन प्रौढांमध्ये परस्पर सहमतीने झालेले शारिरीक संबंध बलात्कार नाही, दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना महत्वाची टिप्पणी केली आहे. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे. असे सांगत एका तरुणाला बलात्कार प्रकरणात जामीन देण्यात आला आहे. या दरम्यान न्यायलयाने हेही अधोरेखित केले की, लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खोट्या केसेसमुळे आरोपीची प्रतिमा मलिन होते. न्यायमूर्ती अमित महाजन यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, समाज मान्यतेनुसार लग्न झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे एक आदर्श मानला जातो. मात्र दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर झालेले संबंध बलात्कार ठरु शकत नाही. मग वैवाहिक स्थिती काहीही असो. लैंगिक गुन्ह्यांची खोटी प्रकरणे आरोपींची प्रतिमा मलिन करतात आणि खऱ्या खटल्यांची विश्वासार्हताही नष्ट करतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आरोपी तरुणाला जामीन देण्यात आला आहे. अहवालानुसार, महिलेने आरोप लावले आहेत की, तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने आरोप केले की, आरोपी विवाहीत असून त्याला 2 मुलं आहेत. महिलेने दावा केला की, तरुण तिच्याकडून भेटवस्तू मागायचा आणि तिने त्याला 1.5 लाखाची रोख रक्कमही दिली होती. न्यायालयाने सांगितले की, तरुणी या घटनेवेळी अल्पवयीन होती. तसेच, जामीन देताना, लग्नाच्या आश्वासनावर तिची संमती प्रभावित झाली होती, हे सिद्ध करता आले नाही, असेही सांगितले. न्यायालयाने हा तपासाचा विषय मानला आहे.

अहवालानुसार, न्यायालयाने सांगितले की, खरंतर पिडीता तक्रार दाखल करण्याआधी त्या तरुणाला भेटत होती आणि तो विवाहीत असल्याचे कळल्यानंतरही तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. न्यायालयाने म्हटले, आरोपी तरुणाच्या जामिनावर विचार करताना कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे न्यायालयाला शक्यही नाही आणि योग्यही नाही. पुराव्याचे मूल्यमापन केल्यानंतर यावर योग्य निर्णय देता येईल असे न्यायालयाने म्हंटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;