शिरूर – शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानात भीषण आग, 26 लाखांचा माल जळून खाक
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकानाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या यागीमध्ये किराणा दुकानातील माल जळून खाक झाला. यात दुकानदाराचे जवळपास 26 लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी दुकानाचे मालक दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांनी टाकळी हाजी पोलीस स्थानकाणध्ये रितसर तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारस घडली.
दुकानातून धूर येत असल्याचे कळता मळगंगा मंदिरात पालखी जवळ असलेले भक्त जयसिंग शिंदे यांनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र शटरमध्ये विजप्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आवाज देऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. परंतु काही करण्याच्या आत आगीने उग्र रुप धारण केले आणि बघता बघता दुकानातील सर्व किराणा माल, फ्रिज, दुकाना लावलेली दुचाकी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. दुकान मालकाचे कुटुंबीय शेजारील खोलीत झोपलेले असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List