दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचारी निलंबित!
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमाविरोधात परवानगी न घेता या कर्मचाऱयांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. उपराज्यपालांनी आज महिला आयोगातील सर्व पंत्राटदार कर्मचाऱयांना हटवण्याचे एक तुघलकी फर्मान जारी केले. महिला आयोगात एकूण 90 स्टाफ आहे. ज्यात केवळ 8 लोक सरकारी आहेत. बाकी सर्व 3-3 महिन्यांच्या पंत्राटावरील आहेत. जर सर्व पंत्राटदार हटवले तर महिला आयोगाला कुलूप लावले जाईल. असे का करत आहेत हे लोक? माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी महिला आयोग बंद पडू देणार नाही. मला जेलमध्ये टाका, परंतु महिलांवर अन्याय करू नका, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List