हेलिकॉप्टर क्रॅशनंतर सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सर्व सत्य बाहेर…’

हेलिकॉप्टर क्रॅशनंतर सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सर्व सत्य बाहेर…’

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पोलीस सर्व सत्य समोर आणतील असे म्हटले.

माध्यमांनी या घटनेबद्दल विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘सध्यातरी काहीच बोलणे उचित नाही. पोलीस त्यांचे काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल. तसेच सर्वांच्या आशिर्वादामुळे आम्ही सुखरुप आहोत, असेही त्या म्हणाल्या.

नक्की काय घडले?

सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर क्रॅशचा घटनाक्रमही सांगितला. महाडमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारसभा होती. या प्रचारसभेनंतर रात्री पावणे दोन वाजता अनिल नवगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, रात्रभर गोंधळाची परिस्थिती होती. रात्रभर कार्यकर्ते जागले होते आणि पोलीस स्थानकात होते. त्यामुळे सकाळी मी सहकाऱ्यांसोबत हेलिपॅडवर आले. सकाळी पावणे नऊचे लँडिंग आणि नऊचे टेकऑफ होते. 9.10 पर्यंत कोणतीच हालचाल दिसत नसल्याने को-ऑर्डिनेटला फोन करून माहिती घेतली. त्यांनी 10ते 15 मिनिटात हेलिकॉप्टर लँड होत असल्याची माहिती दिली.

साधारण 9.20 वाजता हालचाल जाणवल्याने आम्ही गाडीतून खाली उतरलो. पण हेलिकॉप्टरने आकाशात तीन-चार चकरा मारल्या आणि अचानक गोल फिरत खाली आले. बघता बघता धुळीचे लोट उडाले आणि मोठा आवाज झाला. नक्की काय झाले हे देखील आम्हाला कळाले नाही. दोन मिनिटांनी चालकाने कळवले की हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. पायलटची काळजी वाटल्याने आम्ही धावत तिकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्फोटाची भिती असल्याने सहकाऱ्यांनी अडवले. सुदैवाने पायलट आणि त्याचा सहकारीही सुखरूप आहे, असेही अंधारे यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;