जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

दुबईला पुन्हा पावसाने झोडपले

दुबईला आज पुन्हा वादळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे दुबईवर जलप्रलयाचे संकट उभे ठाकलंय. वादळी पावसामुळे उड्डाणे रद्द झाली. बस सेवेवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या. अनेक पंपन्यांनी कर्मचाऱयांना घरून काम करण्याचा सूचना दिल्या. तसेच अनेक शाळांना ऑनलाइन वर्ग भरविण्यास सांगितले.

 

अमेरिकेत 1300 विद्यार्थ्यांना अटक

पॅलेस्टाईनला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन चिघळले. अमेरिकन पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड करायला सुरुवात केली. अमेरिकेतील 30 विद्यापीठांत आंदोलन करणाऱया जवळपास 1300 हून जास्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांची यूसीएलएच्या पॅम्पसमध्ये इस्रायल समर्थक विद्यार्थ्यांशी झटापट झाली.

 

संसर्गामुळे बोइंग कर्मचारी जोशुआ डीन यांचा मृत्यू

बोइंग सप्लायर स्पिरिट एअरोसिस्टमचे माजी क्वॉलिटी ऑडिटर जोशुआ डीन यांचे मंगळवारी निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. जोशुआ डीन यांचा मृत्यू अचानक आणि वेगाने पसरणाऱया संसर्गामुळे  झाला आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. दोन महिन्यापूर्वी अन्य एका बोइंग व्हिसलब्लोअर जॉन बार्नेट यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आत्महत्या केली होती. जोशुआ डीन दोन आठवडयापासून आजारी पडले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

 

तपासणीवेळी चिमुकल्याच्या खिशात सापडली बंदूक

सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा कान पकडत माफी मागत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबई मेट्रो स्टेशनवरील हा व्हिडीओ असून सुरक्षा रक्षकांकडून तपासणी होत असताना एका चिमुकल्याच्या खिशात खेळण्यातील बंदूक सापडली. बंदूक सापडल्यानंतर तपासणी करणारा सुरक्षा रक्षक वरिष्ठांशी काही बोलणार इतक्यात चिमुकल्याने कान पकडत चुकून झाल्याचे हावभाव व्यक्त केले आहेत. हे सर्व घडताना चिमुकला आपण काहीतरी चूक केल्याच्या भावनेने जेव्हा कान पकडतो तेव्हा मेट्रो स्टेशनवर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱयांच्या चेहऱयावर स्मितहास्य उमटले.

 

गोल्डी ब्रार अजूनही जिवंत

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर सतिवंदर सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार याच्या मृत्यूचा दावा खोटा असल्याचे अमेरिकेतील पॅलिपहर्निया पोलिसांनी म्हटले आहे. बुधवारी फ्रेस्नो परिसरात गोळीबाराची घटना घडली. दोन जण जखमीही झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र ही व्यक्ती गोल्डी ब्रार नसून झेवियर गॅलाडनी (वय 37) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोल्डी ब्रारची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे, असा दावा काल दिवसभर करण्यात आला. गँगस्टर गोल्डी ब्रार हा यूएपीएअंतर्गत घोषित केलेला दहशतवादी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;