आयआयटी मुंबईचे नवे संशोधन, रोबोट्स एकमेकांच्या मदतीने करणार काम
आयआयटी मुंबईच्या एका अभ्यास गटाने रोबोट्सची कार्यक्षमता वाढविणारी नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये रोबोट्स एकमेकांशी पूर्वीपेक्षा जास्त कार्यक्षम पद्धतीने संवाद साधू शकतात असे संशोधनातून समोर आले आहे. रोबोट्सची कामे गुंतागुंतीची आणि किचकट असतात. एका वेळेस सारख्या किंवा भिन्न क्षमतेचे अनेक रोबोट्स या कामांसाठी वापरले जातात.
आयआयटी मुंबईतील प्राध्यापक अनिर्बान गुहा आणि प्राध्यापिका अर्पिता सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली केशब पात्रा गट रोबोट्सचा अभ्यास करत आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी तीन नावीन्यपूर्ण अल्गोरिदम मांडले आहेत. या अल्गोरिदमच्या सहाय्याने रोबोट्स स्वतःची कार्ये करण्याची तत्कालीन क्षमता क्षणाक्षणाला निश्चित करू शकतात आणि बदलत्या परिस्थितीनुसार व प्रत्येक रोबोटच्या तत्कालीन स्थितीतील बलस्थान आणि मर्यादेनुसार कामाची विभागणी करू शकतात. दोन एकसारखे रोबोट एक वस्तू उचलून नेत आहेत. कधी कधी जमीन उंचसखल असल्यामुळे किंवा वस्तूच्या आकारामुळे एका रोबोटला दुसऱयापेक्षा वस्तूची जास्त चांगली पकड मिळू शकते. अल्गोरिदम अशी स्थिती ओळखू शकतात आणि रोबोटच्या कामात त्या त्या वेळी उपयुक्त बदल करून चांगले काम करून घेऊ शकतात, असे केशब यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List