अनुज थापन आत्महत्या प्रकरण, सीआयडीच्या चौकशी अहवालातून चित्र स्पष्ट होईल
पोलिसांच्या कोठडीत गळफास लावून आत्महत्या केलेल्या अनुजकुमार थापन (32) याच्या मृतदेहाचे आज जे. जे. इस्पितळात शवविच्छेदन करण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास करणाऱया सीआयडीच्या चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते, या घटनेला कोणाचा हरगर्जीपणा कारणीभूत आहे ते समजू शकणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अनुज थापन याला पंजाब येथून पकडून आणण्यात आले होते. एसीपी दर्जाचे अधिकारी अनुज तसेच अन्य आरोपींकडे चौकशी करत होते, पण बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अनुज हा कोठडीलगतच्या टॉयलेटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर कोठडीतील मृत्यूचे हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. आता नियमानुसार 174 सीआरपीसीनुसार सीआयडी चौकशी तर 176 सीआरपीसीनुसार न्यायालयीन चौकशी होईल. सीआयडीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कोणाचा हलगर्जीपणा होता का? ते पाहून मग त्यानुसार कारवाई केली जाईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List