तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत, अद्याप मार्च महिन्याचेच वेतन मिळालेले नाही

तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत, अद्याप मार्च महिन्याचेच वेतन मिळालेले नाही

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱया अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिना सुरू झाला तरी या शिक्षकांना अद्याप मार्च महिन्याचेच वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हे शिक्षक सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

मस्ट शिक्षक संघटनेने या प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहिले असून सरकारच्या धोरणानुसार तंत्रशिक्षण संचालनालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे पगार महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी केली आहे.

शिक्षकांना अद्याप मार्च महिन्याचाच पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. साधारण 10 तारखेच्या आत कर्जाचे हप्ते कर्जदाराच्या बंक खात्यातून अदा केले जातात. त्यानंतर कर्जाचे हप्ते न भरल्यास संबंधित कर्जदाराला पेनल्टीसोबतच व्याज द्यावे लागते. तसेच सिबिल रेकॉर्डही खराब होतो. मस्ट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विजय पवार आणि महासचिव डॉ. निर्मला पवार यांनी सरकारकडे शिक्षकांचा मार्च महिन्याचा पगार लवकरात लवकर देण्याची तसेच दर महिन्याच्या एक तारखेला पगार अदा करण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;