जीव दे म्हणणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही

जीव दे म्हणणे, आत्महत्येस  प्रवृत्त करणे नाही

 

रागाच्या भरात ‘जा, जीव दे’ असे म्हणणे म्हणजे त्याला आत्महत्या करायला भाग पाडणे मानले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. आत्महत्येच्या प्रकरणामध्ये सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने आज ही महत्त्वाची टिपणी केली. आत्महत्येप्रकरणी याचिकाकर्त्याला दिलासा देत हायकोर्टाने त्याच्यावरील कारवाई रद्द केली. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा कोणताही हेतू नव्हता. केवळ दुःखातून तसे वक्तव्य केले गेले. हायकोर्टाने म्हटले की, याचिकाकर्ता आरोपी आहे. त्याची पत्नी आणि चर्चचा फादर यांचे काही संबंध होते. त्यामुळे नाराज असलेल्या पतीने म्हटले होते की, ‘‘जा, जाऊन गळफास लावून घे.’’ याचा अर्थ असा होत नाही की, आयपीसीच्या कलम 107 अंतर्गत आणि कलम 306 अंतर्गत याचिकाकर्त्याने आत्महत्येसाठी त्या व्यक्तीला उकसवले, असे हायकोर्टाने नमूद केले. आरोपीने आत्महत्या करण्याची अनेक कारणे असू शकतात. चर्चचा फादर असूनदेखील त्याचे याचिकाकर्त्याच्या पत्नीसोबत अवैध लैंगिक संबंध होते, असेही हायकोर्टाने म्हटले. याचिकाकर्त्यावर एका ज्युनियर पादरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;