चोरटय़ाने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलिसाचा मृत्यू, सायन-माटुंगादरम्यानची घटना
मिंधे सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पार तीनतेरा वाजले आहेत. मोबाईल चोरटय़ाचा पाठलाग करत असताना चोरटय़ाने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशाल पवार असे मृताचे नाव असून तो मुंबई पोलिसांच्या एल 3 मध्ये कार्यरत होता. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी चोरटय़ाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तपासासाठी पथक तयार केले आहे.
विशाल हे एल 3 मध्ये कार्यरत होते. गेल्या आठवडय़ात ते डय़ुटी संपवून घरी जात होते. ते दरवाजाजवळ पह्नवर बोलत उभे होते. लोकल माटुंगा आणि सायनदरम्यान असताना त्यांच्या हातावर चोरटय़ाने फटका मारला. फटका मारल्याने पवार यांचा पह्न खाली पडला. पह्न खाली पडल्यावर तो चोरटा घेऊन पळून जाऊ लागला. लोकलची गती कमी असल्याने पवारदेखील खाली उतरून चोरटय़ाचा पाठलाग करू लागले.
तोंडात ओतले लाल द्रव्य
रात्रीच्या अंधारात पवार हे चोरटय़ाचा पाठलाग करत होते. काही अंतर गेल्यावर त्यांनी एका चोरटय़ाला पकडले. त्यानंतर आणखी तेथे काही चोरटे आले. त्या चोरटय़ाच्या टोळीने पवार यांच्यावर हल्ला केला. चोरटय़ाने पवार यांना पकडून ठेवले. त्यानंतर दुसऱया चोरटय़ाने त्यांच्या पाठीवर विषारी इंजेक्शन मारले. तसेच चोरटय़ाने पवार यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव्य ओतले. त्यामुळे पवार हे तेथेच बेशुद्ध अवस्थेत पडून होते. दुसऱया दिवशी सकाळी त्यांना शुद्ध आली. ते कसे बसे घरी आले. प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार समजताच कोपरी पोलीस तेथे गेले. कोपरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 392 (दरोडा), 394 (लुटताना दुखापत करणे), 328 (विषारी द्रव्य पाजून इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान बुधवारी रात्री पवार यांचा मृत्यू झाला. कोपरी पोलिसांनी हा गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List