नियम बदलले! कंटेंट ओरिजनलच हवा!! इन्स्टा युजर्सचे टेन्शन वाढले
इन्स्टाग्रामने आपल्या अल्गोरिदमसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. पंपनीने प्लॅटफॉर्मवर ओरिजिनल पंटेंटला जास्त प्राधान्य देत नियम बदलले आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱया सर्वांनाच हे नियम माहीत असणे गरजेचे आहे. लहान पंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचे पंपनीने म्हटले आहे. तसेच दुसऱयांचा पंटेंट रिपोस्ट करणाऱयांना त्यामुळे आळा बसणार आहे. त्यामुळे अशा युजर्सचे टेन्शन आता वाढणार आहे. कारण इन्स्टाग्रामवर ओरिजिनल पंटेंट क्रिएटर्स कमी आणि कॉपी करणारे क्रिएटर्स जास्त आहेत.
ओरिजिनल पंटेंट
इन्स्टाग्रामवर आता ओरिजिनल पंटेंट शेअर करणाऱयांना वेगळी ओळख मिळणार आहे. ओरिजिनल पोस्टवर ‘ओरिजिनल पंटेंट क्रिएटर’ असे लेबल मिळणार आहे. त्यामुळे ती पोस्ट रिपोस्ट केल्यानंतरदेखील ओरिजिनल पंटेंट कुणाचा आहे हे लक्षात येणार
आहे.
डुप्लिकेट पंटेंट
इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन फीडमधून आता रिपोस्ट केलेल्या पोस्टना हटवण्यात येणार आहे. त्यामुळे डुप्लिकेट पंटेंट कमी होण्यास मदत होईल. तसेच दुसऱयांच्या पोस्ट वारंवार रिपोस्ट करणाऱया युजर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
पोस्ट–रिपोस्ट
इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करून हजारोंमध्ये ह्यू आणि लाईक्स मिळवणारे भरपूर अकाऊंट आहेत. एखादा रिपोस्ट केलेला पंटेंट व्हायरल जात असला तरीही रिकमेंडेशनमध्ये ओरिजिनल पोस्टलाच प्राधान्य दिलं
जाणार आहे.
छोटे क्रिएटर्स
इन्स्टाग्रामच्या या बदललेल्या अल्गोरिदमचा फायदा लहान पंटेंट क्रिएटर्सना होणार आहे. ज्या लोकांना कमी फॉलोवर्स आहेत. मात्र ते ओरिजिनल पंटेंट पोस्ट करत आहेत त्यांना आता इन्स्टाग्रामवर अधिक संधी मिळणार आहे. यापूर्वी केवळ अधिक फॉलोवर्स असणाऱया युजर्सना रिकमेंडेशनमध्ये प्राधान्य दिले जात होते. मात्र आता हे बदलणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List