20 वर्षांत आयआयटीच्या 115 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आयआयटी मद्रासमध्ये सर्वाधिक
मागील 20 वर्षांत देशभरातील आयआयटीमध्ये तब्बल 115 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2005 ते 2024 दरम्यान आयआयटी मद्रासमध्ये सर्वाधिक 26 विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आयआयटी मुंबईच्या 10 विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी माजी विद्यार्थी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंह यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराद्वारे ही माहिती समोर आली आहे.
आयआयटी कानपूरमध्ये 18, खरगपूरमध्ये 13 मृत्यूंची नोंद आहे. एकूण मृत्यूंपैकी 98 मृत्यू आयआयटी पॅम्पसमध्ये झाले होते. यात 56 विद्यार्थ्यांनी गळफास घेतला होता, तर 17 विद्यार्थ्यांनी पॅम्पसबाहेर आपला जीवन प्रवास संपवला. 12 फेब्रुवारी 2023 मध्ये आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सिंह यांनी गेल्या 20 वर्षांत देशभरातील आयआयटीयन्सच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली होती. आयआयटी मुंबईच्या दर्शन सोलंकीच्या मृत्यूनंतर विविध आयआयटी विद्यार्थी संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू शैक्षणिक ताणतणावामुळे झाल्याचे समोर आले आहे. यानंतर नोकरीची असुरक्षितता, काwटुंबिक समस्या आणि छळवाद ही कारणे आहेत.
सोलंकी यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध पावले उचलली आणि उच्च शिक्षण संस्थांना शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, कल्याण आणि मानसिक आणि भावनिक कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी सल्लागार जारी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List