‘नाच गं घुमा’चा तिकीटबारीवर धुमाकूळ; एका दिवसात कमावला सवादोन कोटींचा गल्ला

‘नाच गं घुमा’चा तिकीटबारीवर धुमाकूळ; एका दिवसात कमावला सवादोन कोटींचा गल्ला

 

महिलाप्रधान चित्रपटांना मराठी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा 2’नंतर आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.13 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘नाच गं घुमा’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ‘बुक माय शो’वर 20 हजार तिकिटांच्या बुकिंगचा विक्रम नोंदविला होता. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड या पेंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला. खासकरून महिला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड व्रेझ असून महिलांच्या अनेक ग्रुपनी चित्रपटाचे संपूर्ण शो आरक्षित केले आहेत. त्यामुळे विकेण्डला कलेक्शनमध्ये मोठी वाढ होईल. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;