गुरुचरण सिंह बेपत्ता, 11 दिवसांनंतर मोठी अपडेट समोर, पोलीस करणार असं काम

गुरुचरण सिंह बेपत्ता,  11 दिवसांनंतर मोठी अपडेट समोर, पोलीस करणार असं काम

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 11 दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण सिंह मालिकेत रोशन सिंग सोढी भूमिका साकारत होता. पण काही वाद झाल्यामुळे अभिनेत्याने मालिकेचा देखील निरोप घेतला. आता अभिनेता दिल्ली येथून गायब आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याप्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांची एक टीम आता मुंबईत पोहोचली असून लवकरच मुंबई पोलिसांसह दिल्ली पोलिसांची ही टीम गुरुचरण सिंग याच्या मित्रांची आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या स्टार कास्टची चौकशी करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस सर्वातआधी गुरुचरण सिंग याच्या मुंबईत मलाड याठिकाणी असलेल्या घराचा चौकशी करणार आहेत. शिवाय अभिनेताच्या शेजारी राहत असलेल्यांची देखील चौकशी होणार आहे. याप्रकरणी पोलीस भक्ती सोनी यांची देखील चौकशी करणार आहेत. अभिनेत्याच्या फोनची देखील चौकशी सुरु आहे.

मात्र दिल्ली किंवा मुंबई पोलिसांनी आणि गुरुचरण यांच्या निकटवर्तीयांकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र गुरुचरण सिंह याची चर्चा सुरु आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून गुरुचरण सिंह याची की ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कास्टमधील कोणासोबत देखील बोलणं झालं नव्हतं.

एका अभिनेत्याने माझं नाव समोर यायला नको या एका अटीवर मोठी माहिती दिली आहे. मालिकेतील काही मित्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून गुरुचरण सिंह याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अभिनेत्याला फोन लागायचा पण समोरुन कोणतं उत्तर येत नव्हतं. अखेर काही लोकांनी वैतागून त्याला फोन करणं देखील बंद केलं होतं.

गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करत होता. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण एक दिवस असा आला जेव्हा अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला. अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतल्यानंतर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही. सोशल मीडियावर अभिनेता कायम सक्रिय असायचा.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता सोशल मीडियाची मदत घ्यायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांसोबत काही वाद झाल्यानंतर गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता अचानक गायब झाल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;