विजया शेवाळकर यांचे निधन
प्रख्यात साहित्यिक, प्राचार्य राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर (86)यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
विजया शेवाळकर यांनी आपले जीवन राम शेवाळकरांच्या कार्याला समर्पित केले होते. ‘मी जे काही आयुष्यात करू शकलो ते पत्नीमुळेच,’ असे राम शेवाळकर म्हणायचे. विजया यांनी सुरुवातीच्या काळात ध्रुव नावाचे बालक मंदिर सुरू केले. काही वर्षे ते उत्तम रितीने चालविलेही. परंतु राम शेवाळकरांच्या कार्याचा व्याप वाढल्यानंतर त्यांनी ते बंद करून आपला पूर्णवेळ त्यांच्याकरिता दिला. नुकतेच त्यांच्या मुलाखतीचे ‘सहवासाच्या चांदण्यात’ हे रेखा चवरे यांनी लिहिलेले पुस्तक सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडणारी विजयाताईंची ही मुलाखत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List