सियाचीनमधील चीनच्या रस्ता बांधणीचा हिंदुस्थानकडून तीव्र निषेध

सियाचीनमधील चीनच्या रस्ता बांधणीचा हिंदुस्थानकडून तीव्र निषेध

 सियाचीन भागाच्या उत्तरेकडे हिंदुस्थानी हद्दीतील शक्सगाम खोऱयातून रस्ता बांधल्याबद्दल हिंदुस्थानने चीनकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या भूभागातील परिस्थिती बदलण्याचे हे प्रयत्न बेकायदा असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे. शक्सगाम खोरे हा हिंदुस्थानचाच भाग असून, हा भाग चीनच्या सुपूर्द करण्याच्या चीन-पाकिस्तानमधील 1963च्या कथित सीमा कराराला हिंदुस्थानने कधीही मान्यता दिलेली नाही, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. देशाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा हक्क हिंदुस्थान राखून ठेवत आहे, असे ते म्हणाले. पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील साडेतीन वर्षांहून अधिक जुन्या सीमावादाच्या दरम्यान या प्रदेशात चिनी बांधकाम उपक्रम सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;