IPL 2024 – तरीही मुंबईकडून चमत्काराची अपेक्षा; आज कोलकात्याविरुद्ध संघर्ष

IPL 2024 – तरीही मुंबईकडून चमत्काराची अपेक्षा; आज कोलकात्याविरुद्ध संघर्ष

सलग दोनदा पराभवाची हॅटट्रिक झेलणाऱ्या मुंबईचे आव्हान संपल्यातच जमा आहे, पण व्हेंटिलेटरवर असलेल्या मुंबईकडून विजयासह चमत्काराच्या मालिकेची अपेक्षा आहे. ती अपेक्षा खचलेला मुंबईचा संघ पूर्ण करू शकेल, याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. दुसरीकडे कोलकात्याला आपल्या विजयाची सप्तमी साजरी करत प्ले ऑफमधील आपले स्थान आणखी बळकट करण्याची संधी आहे. त्यामुळे आयपीएलमधून बाद होण्याच्या कडय़ावर असलेल्या मुंबईला आपला जोरदार आणि दिमाखदार खेळच स्फूर्ती देऊ शकतो.

पाचवेळा आयपीएलच्या ट्रॉफीचे चुंबन घेणाऱ्या मुंबईची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. दहापैकी सात सामन्यांतील पराभवाच्या मालिकेने मुंबईचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्याच्या चाहत्यांची अजूनही भोळीभाबडी आशा आहे. मुंबई पुढील चारही सामन्यांत मोठय़ा विजयासह नेट रनरेटमध्ये बाजी मारून शेवटच्या क्षणी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवतील, असे सर्वांना वाटतेय. पण हे क्रिकेटच्या भाषेत निव्वळ अशक्य आहे. फक्त दैवी चमत्कार असं करू शकतं. जे या क्षणाला घडणे अशक्य आहे.

मुंबईच्या फलंदाजांसह गोलंदाजीत बुमराला कुणाचीही अपेक्षित साथ लाभलेली नाही. ती उद्या लाभेल याबाबतही शंका आहे. मुंबईच्या पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांना फोडण्याचीच रात्र असणार आहे. त्यामुळे वानखेडेवर मुंबईकरांना फलंदाजांच्या बॅटीतून सुटणारे षटकाररुपी रॉकेट्स याचि देही अनुभवता येतील. त्यामुळे उद्या जो नाणेफेक जिंकणारा तोच संघ सरस ठरणार. पण वानखेडेवर हवाई हल्ले रोहितच्या बॅटीतून होणार की सुनील नारायणच्या, हे उद्याच कळू शकेल.

मुंबईचे सारे वर्ल्ड कपवीर फ्लॉप

हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कप संघात दमलेल्या मुंबई इंडियन्सचे एक नव्हे तर चार-चार खेळाडू आहेत. पण हिंदुस्थानची संघ निवड जाहीर होताच जोशात येऊन आपला खेळ दाखवण्याऐवजी हे स्टार पहिल्याच सामन्यात विझले. लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने घोर निराशा केली. तो बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा होती, पण त्यानेही माती खाली. पुढे हार्दिक पंडय़ानेही आपल्या अपयशाचा झेंडा आणखी खोलवर गाडला. हिंदुस्थानचा अंतिम संघात असलेल्या या तिघांची गेल्या तीन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या छातीत दुखू लागले आहे. या तिघांनाही आपले अपयश धुवून काढावे लागणार आहे. एकटा जसप्रीत बुमरा सुस्साट असला तरी त्यालाही लखनऊविरुद्ध विकेटचा टिळा लावता आला नव्हता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;