‘बेस्ट’ला पालिकेचा 200 कोटींचा टेकू! पालिका आयुक्तांनी दिली माहिती

‘बेस्ट’ला पालिकेचा 200 कोटींचा टेकू! पालिका आयुक्तांनी दिली माहिती

आर्थिक तोटय़ातून चाललेल्या ‘बेस्ट’च्या परिवहन उपक्रमाला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक स्थैर्यासाठी 200 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम ‘बेस्ट’ला कर्मचाऱयांची देणी, कर्जफेड करण्यासाठी वापरता येणार असल्यामुळे ‘बेस्ट’ला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, ‘बेस्ट’ला एकूण 800 कोटी रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यातील 200 कोटी आता देण्यात येतील, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती खालावल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.  एकेकाळी स्वतःच्या पाच हजार बसेसची संख्या आता थेट 1097 पर्यंत खाली आली असून बेस्टकडे भाडेपट्टय़ावरील 1941 बस आहेत. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांवर आली आहे. आर्थिक स्थिती ढासळल्याने ही स्थिती ओढवल्यामुळे पालिका ‘बेस्ट’ला दरवर्षी कोटय़वधीची मदत करीत आहे, तर या वर्षी अर्थसंकल्पातही 800 कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा तत्कालीन पालिका आयुक्तांकडून करण्यात आली आहे. ही मदत टप्प्याटप्प्याने ‘बेस्ट’ला मिळणारच आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पातील तरतुदीव्यतिरिक्त तीन हजार कोटींची मागणी ‘बेस्ट’ने पालिकेकडे केली होती. मात्र ही मदत देण्यास पालिकेने नकार दिला आहे. गेल्या काही वर्षांत दिलेल्या आठ हजार कोटींच्या मदतीचा हिशेब द्या आणि उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करा, असे खडे बोलही पालिकेने ‘बेस्ट’ला सुनावले आहेत. मात्र आता तूर्तास 200 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.

आतापर्यंत आठ हजार कोटींची मदत

‘बेस्ट’ची ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते नोव्हेंबर 2023-24 पर्यंत तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी रुपये अनुदान महानगरपालिकेने ‘बेस्ट’ला आतापर्यंत दिले आहे.

– पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी करणे, विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी

– भाडेतत्त्वावरील नवीन बस घेण्यासाठी, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी

– बेस्ट उपक्रमामार्फत मे. टाटा पॉवर पंपनी लि. यांना देय असलेली विद्युत देणी अदा करण्यासाठी

–  बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांना दिवाळीकरिता सानुग्रह अनुदान, निवृत्त कर्मचाऱयांची देणी देण्यासाठी

– बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांना कोविड प्रोत्साहन भत्त्याचे अधिदान करण्यासाठी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;