Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार, तर अमेठीतून…
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पाचव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातही मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत येथून नक्की कोण लढणार याचा सस्पेन्स कायम होता. मात्र हा सस्पेन्स आता संपला असून काँग्रेसने या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेसने रायबरेली या मतदारसंघातून राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीतून प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता होती. मात्र ही शक्यता शक्यताच राहील असून अमेठीतून काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना तिकीट दिले आहे.
‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए श्री @RahulGandhi को उत्तर प्रदेश के रायबरेली से और श्री किशोरी लाल शर्मा को अमेठी से कांग्रेस उम्मीदवार घोषित किया गया है। pic.twitter.com/AyFIxI62XH
— Congress (@INCIndia) May 3, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List