रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचा झंझावात; कणकवलीत उद्धव ठाकरे यांची आज सभा
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय येथील मैदान
वेळ – सायं. 6 वाजता
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा झंझावाती प्रचार सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या कणकवली शहरात दणदणीत सभा होणार आहे. या सभेमुळे कोकणात शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा झंझावात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरू असून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाआधी उद्या कोकणात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर (नरडवे फाटय़ाजवळ) ही सभा होणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List