प्रशिक्षित एजंटकडून घर खरेदी-विक्री न केल्यास प्रकल्पाची नोंदणी रद्द होणार; महारेराचा बिल्डरांना दणका
प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक एजंटकडून घर खरेदी-विक्रीची व्यवहार करणे महारेराने 1 जानेवारी 2024 पासून बंधनकारक आहे. तरीही अनेक विकासक या नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. अशा विकासकांच्या प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय ‘महारेरा’ने घेतला असून प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचा आदेश नुकतेच जारी केले आहेत.
ग्राहकहित डोळय़ासमोर ठेवूनच महारेराने 10 जानेवारी 2023 च्या आदेशान्वये एजंटसाठी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केले आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी महारेराने सुमारे वर्षभराचा कालावधी दिला होता. 1 जानेवारी 2024 पासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरणही न करण्याचा निर्णय महारेराने घेतला. विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी 1 जानेवारीनंतर अशा प्रशिक्षित एजंटची नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले होते. असे असूनही काही विकासकांनी महारेराच्या निर्देशाचे पालन केलेले नाही म्हणून हा निर्णय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List