बसपाच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील सहा उमेदवारांची यादी बहुजन समाज पार्टीने जाहीर केली आहे. या यादीत कैसरगंड, गोंडा, संत कबीरनगर, बाराबंकी, आजमगढ या मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून पक्षाने कैसरगंज येथून ब्राम्हण कार्ड खेळले असून येथून नरेंद्र पांडे यांना तिकीट दिले आहे.
गोंडा येथून सौरभ कुमार मिश्रा, डुमरियागंज येथून मोहम्मद नदीम मिर्जा, संतकबीरनगर येथून नदीम अशरफ, बाराबंकी येथून शिव कुमार दोहरे यांना तिकीट दिले आहे. आजमगढ येथून उमेदवार बदलला असून येथून मशहूद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लखनौ पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी आलोक कुशवाहा यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List