उष्णतेच्या लाटेमुळे तेलंगणात मतदानाची वेळ वाढवली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट असून पारा 44 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेलंगणा येथे मतदानाची वेळ अर्ध्या तासाने वाढवण्यात आली आहे. म्हणजेच तेलंगणात सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. उष्माघातामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 यादरम्यान बाहेर पडणे धोक्याचे असून पुढचे काही दिवस अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी मतदानाची वेळ बदलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
तेलंगणामध्ये 17 लोकसभा जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. कडक उन्हामुळे तेलंगणामध्ये मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. 17 मे रोजी करीमनगर, निजामाबाद, जहीराबाद, मेडक, मल्काजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नगरकुर्नूल, नलगोंडा आणि भोंगिर येथे मतदान होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List