विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

बाटलीच्या आतून पेस्ट स्वरूपातील सोने तस्करी प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका खासगी पंपनीच्या कर्मचाऱयाला पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) पकडले. त्याच्याकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2.4 कोटी इतकी आहे.

विमानतळावर आज सकाळी विमानतळावर काम करणारा कर्मचारी हा बाहेर पडला. त्याच्याकडे स्टीलची बाटली होती. गस्तीवर असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी ती बाटली उचलली. ती बाटली नेहमीपेक्षा जड असल्याचे जवानांच्या लक्षात आले. ती बाटली तपासणीसाठी स्पॅनिंग मशीनमध्ये टाकली. त्या बाटलीमध्ये काही संशयास्पद वस्तू लपवल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या बाटलीची तपासणी केली. बाटलीमध्ये पेस्ट स्वरूपात सोने होते. याची माहिती सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयांना दिली. त्या कर्मचाऱयाला पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क अधिकाऱयाच्या स्वाधीन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;