लंके यांनी घेतले अण्णा हजारे यांचे आशीर्वाद
लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी येथे येत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
लंके यांनी निवडणूक प्रक्रिया दरम्यान राबविलेल्या यंत्रणेबाबत अण्णा हजारे यांना माहिती दिली. दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मतदार संघातील गावा गावात संपर्क केल्याचे लंके यांनी सांगितल्यानंतर इतक्या मोठ्या मतदार संघात केलेल्या संपर्काविषयी हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. हजारे म्हणाले सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता असून उन्हाची काळजी घेऊन प्रचार करा असा सल्ला हजारे यांनी लंके यांना दिला.
हजारे म्हणाले आमदार म्हणून काम करताना नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात भरीव काम केले आहे. मतदारसंघातील जनतेपुढे त्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पारनेर तालुक्याचा प्रतिनिधी लोकसभेत जाण्याची यंदा संधी आहे. संधीचे सोने करा असा सल्ला अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List